भरधाव ट्रकची धडक;पादचार्‍याचा मृत्यू

निघोजे येथील घटना;महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 0
भरधाव ट्रकची धडक;पादचार्‍याचा मृत्यू

क्राईम | भरधाव ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू झाला. ही घटनाउ मंगळवारी (दि.१७) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.

महमद नौशाद इर्शाद (वय ३०) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी (एमएच 12 एच डी 7372) या ट्रकवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धरजकुमार काशिनाथ राम (वय.२७, सध्या रा. सारा सिटी, ता. खेड, जि. पुणे. मूळगाव बडकालाट, ता. बानपूर, जि. रोहतास, बिहार) यांनी बुधवारी (दि. १८) दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमद इर्शाद हा रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने त्यास पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर ट्रक त्याच्या पायावरून गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.दक्षिण महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.