कंपनीतील स्क्रॅपच्या ठेकेदारीवरून राडा;कंपनी व्यवस्थापकास दमदाटी

चाकण ( पुणे ) : कंपनीतील स्क्रॅपचा ठेका घ्यायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील तसेच कंपनीच्या व्यवस्थापकास धमकावत शिवीगाळ दमदाटी करत धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास बबन गाडेकर (वय.५० वर्षे,चालक,रा. भोसे,ता.खेड.जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) प्रज्वल कैलास मोहीते (वय.२७ वर्षे,रा. मोहितेवाडी),२) संकेत ऊर्फ मॉटी नाणेकर (वय. २७ वर्षे,नाणेकरवाडी),३) उसीउल्ला ख्वाब बान (वय.३८ वर्षे,रा.कुदळवाडी,चिखली),इतर दोन तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण औद्योगिक वसाहतमधील व्हिक्टोरीया कंपनीतील स्क्रॅप घेण्यासाठी सुनिल शिवराम राठोड,फिर्यादी रामदास गाडेकर आणि कंपनीचे व्यवस्थापक गौरव पारसमल गादीया यांना प्रज्वल कैलास मोहीते,संकेत ऊर्फ मॉटी नाणेकर यांच्यासह इतर अनोळखी दोन ते तीन जण हे व्हिक्टोरीया कंपनीत येवन स्क्रॅप माल घेवन जाण्याचे कॉट्रॅक्ट आम्हाला मिळाले आहे,तुम्ही घेवुन जायचे नाही म्हणून त्यांनी मोठ्याने शिवीगाळ करुन धमकी दिली होती.
त्यानंतर (दि.०३ ) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास स्क्रॅपने भरलेली गाडी लक्ष्मी वजन काटा येथे उभी करून,व्हिक्टोरीया कंपनीत बिल घेणेसाठी जात असताना गाडेकर यांच्या ट्रकसमोर स्प्लेंडर मोटार सायकल आडवी लावून उसीउल्ला ख्वाब बान याने कंपनीतील स्क्रॅप कोणालाही उचलण्याचे कॉन्ट्रॉक्ट घ्यायचे असेल तर आम्हाला अगोदर पैसे दयावे लागतील असे जोर जोरात म्हणत फिर्यादीचे ट्रकचे समोरील काचेवर दगड मारत शिवीगाळ करत निघन गेले.चाकण पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करत आहे.