पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक; चोरट्याला अटक, घरफोडीसह दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस

 0
पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक; चोरट्याला अटक, घरफोडीसह दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस

क्राईम | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून ४ मोटार सायकली आणि घरफोडीतील सोन्याचे दागिने असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​या कारवाईत पोलिसांनी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २० वर्षे, सध्या रा. गणेश मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ रा. महेंद्र नगर, नेपाळ) याला अटक केली आहे. आरोपीला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे अधिक चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली.

​पोलिसांनी आरोपीकडून एम.आय.डी.सी. परिसरातून चोरलेल्या ४ दुचाकी आणि एका घरफोडीतील दीड ग्रॅम सोन्याचे पदक हस्तगत केले आहे. जप्त केलेल्या वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

१. दक्षिण महाळुंगे ४५/२०२६ MH 14 FW 4277 यामाहा एफ झेड -३०,०००/-

२. दक्षिण महाळुंगे १३३/२०२६ MH 14 JB 6379 स्प्लेंडर -३५,०००/-

३. दक्षिण महाळुंगे १३८/२०२६ MH 14 BP 1650 होंडा शाईन- ३०,०००/-

४. तळेगाव MIDC २९/२०२५ MH 12 RD 3302 होंडा शाईन- ३५,०००/-

५. दक्षिण महाळुंगे ४३/२०२६ (घरफोडी) - सोन्याचे पदक-२०,०००/-

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी..

​सदर कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, बसवराज तेली तसेच पोलीस उप आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि अंमलदार देवराम पाथरी, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांचा समावेश होता.

​या प्रकरणी आरोपीकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून दक्षिण महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत.