चाकण बसस्थानकात प्रवाशावर जीवघेणा हल्ला; मोबाईल व रोख रक्कम जबरीने लुटल्याची घटना

 0
चाकण बसस्थानकात प्रवाशावर जीवघेणा हल्ला; मोबाईल व रोख रक्कम जबरीने लुटल्याची घटना

चाकण : चाकण बसस्थानक परिसरात एका प्रवाशावर दोन अनोळखी आरोपींनी जीवघेणा हल्ला करून त्याची लूट केल्याची घटना समोर आली आहे.सुरेश शांताराम चव्हाण (वय ३२ वर्षे, रा. बालाजीनगर, चाकण,खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश चव्हाण हे (दि.७) रात्री दहा वाजता एसटी बसस्थानकात उभे असताना,दोन अनोळखी इसमांनी सुरेश यांच्याकडे माचिसची मागणी केली.माचीस नसल्याचे सांगितल्यानंतर दोन्ही आरोपींनी बसस्थानकाच्या मागील बाजूस अंधारलेल्या ठिकाणी सुरेशला अडवून चाकूने वार करून गंभीर दुखापत केली.साडे तीन हजार रुपये रोख रक्कम आणि रेडमी कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने लुटून आरोपी चाकण मार्केटकडे पसार झाले.

दरम्यान, (दि.८ ) ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता अक्षय सुभाष पवार (वय २६, रा. सारासिटी,खेड,मूळ रा.माळसळ,जि.नाशिक) याला युनिट तीनच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून आहे.दुसऱ्या अनोळखी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.