फ्रुटच्या मालासह रोख रकमेचा अपहार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

चाकण ( पुणे ) : फ्रूटच्या मालासह रोख रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण येथे मंगळवारी (दि.२५) घडला. चाकण पोलिसांनी या प्रकरणी शनिवारी (दि.२९) रात्री उशिरा सोलापूर जिल्ह्यातील मंगेवाडी येथील एका तरुणावर अपहराचा गुन्हा दाखल केला आहे.
अतिश अशोक मेटे (वय - ४४ वर्ष, रा. आंबेठाण रोड, चाकण,) या फ्रुट चालक व्यवसायिकाने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मेटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी लखन उर्फ बालाजी भारत यलपले (सध्या रा. चाकण, मूळ रा. मंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्यावर विविध कलमान्वये अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, फिर्यादी मेटे व आरोपी लखन हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी लखन याने फिर्यादी मेटे यांचा विश्वास संपादन करून चाकण येथून मंगळवारी (दि.२५) मार्केट यार्ड समोरील विशाल फ्रुट्स स्टॉल मधून ४,५६,९४० रूपये किमतीचा फ्रुटचा माल व रोख रक्कम २,४०,००० असा एकूण ६,९६,९४० रुपये किमतीचा ऐवज पिकअप व कॅरी गाडी (क्र. एम एच १४ जे एल ६८८२) भरून निघून गेला. अद्याप लखन हा परत आला नसल्याने त्याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम मोरे हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत