हिंजवडी आयटी पार्कमध्ये टेम्पो ट्रॅव्हल बसला आग;आगीत चार जणांचा जळून झाला कोळसा

 0
हिंजवडी आयटी पार्कमध्ये टेम्पो ट्रॅव्हल बसला आग;आगीत चार जणांचा जळून झाला कोळसा
हिंजवडी आयटी पार्कमध्ये टेम्पो ट्रॅव्हल बसला आग;आगीत चार जणांचा जळून झाला कोळसा

पुणे : हिंजवडी आयटी पार्क भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एका टेम्पो ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याने चार जणं जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अंगावर काटा आणणारी ही घटना घडली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज एक रोडवर व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल (MH14 CW 3548) बसला अचानक आग लागली होती. यावेळी बसमध्ये बारा प्रवासी होते.आग लागताच त्यातील 8 जणांनी बसच्या बाहेर सुखरुप आले. मात्र चार जण बसमध्ये होरपळले.या चौघांचाही यात मृत्यू झाला आहे. हे कर्मचारी व्योमा ग्राफिक्स कंपनीचे असून ते ऑफिसला जात होते.या बस अपघातात सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रदीप बाबुराव राऊत,विकास गोडसे,मंजिरी अडकर,नंदकुमार सावंत,विठ्ठल दिघे,विश्वास लक्ष्मण खानविलकर हे जखमी झाले आहेत.

बसला अचानक आग लागल्याने हा प्रकार घडल्याची माहिती आहे. टॅम्पो ट्रॅव्हलची बस असल्याने सर्वांना एकाच वेळी बाहेर निघणं शक्य झालं नाही. त्यामुळे ८ जणं बाहेर पडू शकले मात्र चार जणं बसमध्येच अडकले. या जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. अद्याप आगीचं कारण कळू शकलेलं नाही.तरी पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.