उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या विजयी संकल्प सभा;चाकण नगरपरिषद निवडणूक
सह्याद्री DIGITAL NEWS - चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार उद्या सकाळी साडे दहा वाजता महात्मा फुले मार्केटयार्ड येथील भव्य विजयी संकल्प सभेला संबोधित करणार आहेत.
याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
चाकण निवडणूक रणधुमाळीने शहरातील वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही सभा चाकणकरांच्या तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.नगरपरिषद विकास आराखडा,पायाभूत सुविधा,वाहतूक समस्या,औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न,वाढती नागरी गरज आणि पक्षाची आगामी दिशा यावर ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महात्मा फुले मार्केट यार्ड येथील सभा स्थळी मोठी तयारी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.चाकणमधील निवडणूक समीकरणांना वाढता कल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे झुकत असल्याचे कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.