खेड तालुका खरेदी विक्री संचालकपदी निवडीबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अशोक मांडेकर यांचा सन्मान

चाकण ( पुणे ) : खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी खेड तालुक्यातील आंबेठाण गावचे आदर्श माजी सरपंच व आंबेठाण विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष,विद्यमान संचालक अशोक नारायण मांडेकर यांची नुकतीच निवड झाली.त्याबद्दल केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते अशोक मांडेकर यांचा सत्कार वराळे येथे करण्यात आला.
खेड तालुका खरेदी विक्री संघाची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक संपन्न होऊन संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या देखील निवडी २५ मार्च २०२५ रोजी पार पडल्या आहेत.त्यानंतरच्या काळात संघाच्या स्वीकृत संचालक पदासाठी सर्वांच्या सहमतीने अशोक मांडेकर यांची निवड करण्यात आली.खेड तालुक्याच्या सहकारातील अग्रेसर व नावाजलेल्या खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळावर स्वीकृत संचालक म्हणून मांडेकर यांची वर्णी लागली.वराळे (ता.खेड) येथे कार्यक्रमानिमित्त आलेले केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते मांडेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय घुंडरे,राजन परदेशी,राजगुरूनगरचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे,सरचिटणीस संजय रौधळ, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळके,भामाई महिला सक्ष्मीकरण अभियानाच्या प्रमुख सुनीता बुट्टे पाटील,माजी सभापती कल्पना गवारी, सुनील देवकर, दत्तात्रय मांडेकर,रोहित डावरे पाटील, भगवान मेदनकर,गोविंद घाटे,सुरेश पिंगळे,रुपेश वाळके,निलेश घुमटकर, अशोक उमरगेकर,सरपंच पुजा बुट्टे पाटील,गोणवडी सरपंच वैशाली काळे,रोहकल सरपंच प्रमिला काचोळे,शिवाजी डावरे आदी उपस्थित होते.यावेळी खेड तालुका भाजपा राजगुरूनगर मंडल अध्यक्षपदी शिवाजी मांदळे आणि चाकणचे भगवान मेदनकर यांचाही सत्कार मोहोळ यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांशी मोहोळ यांनी संवाद साधला.