विश्वविहार सोसायटीत श्री गणेश जयंती उत्साहात साजरी

 0
विश्वविहार सोसायटीत श्री गणेश जयंती उत्साहात साजरी

सह्याद्री | श्री गणेश जयंती उत्सवाची धूम असतानाच,मंचर शहरातील विश्वविहार सोसायटीत देखील हा उत्सव मोठ्या आनंदात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.यावेळी सोसायटीतील गणेश मंडळाने विविध धार्मिक विधींचे आयोजन करून श्रद्धेने गणरायाची पूजा केली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता श्री गणेशाच्या अभिषेकाने झाली. नंतर आरती आणि साडेदहा वाजता होमहवन व धार्मिक विधी मंदिराचे पुजारी संदीप त्रिवेदी काका यांच्या हस्ते करण्यात आले. या दरम्यान, सायंकाळी श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज प्रासादिक भजनी मंडळाचा सुंदर भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले.

सायंकाळी साडेआठ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले, आणि या वेळी मंचर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेखाताई गांजाळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, नगरसेवक वसंत बाणखेले,डॉ.सोनाली बाणखेले,श्रीमती वंदनाताई कैलास बाणखेले,श्रीमती बेबीताई थोरात,माणिक ताई गावडे,शिवाजी राजगुरू, विकास जाधव,धनेशभाऊ मोरडे,बाजीराव मोरडे, मालतीताई थोरात, आणि विशाल पारधी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन सोसायटीच्या विद्यमान बिल्डर तुषार शेठ बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये सोसायटीतील कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब आरुडे,सभासद सुनील थोरात, आकाश पवार,किसन भालेराव,अनिल वाघ, विकास सुपेकर यांचा मोलाचा सहभाग होता. तसेच, महिला कार्यकर्त्या सुवर्णाताई सुपेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी देखील उत्कृष्ट सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, आणि सोसायटीतील सर्व सभासदांनी आर्थिक सहाय्य करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेत योगदान दिले.