धरण उशाला कोरड घशाला...भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांची पाण्यासाठी टाहो

 0
धरण उशाला कोरड घशाला...भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांची पाण्यासाठी टाहो
धरण उशाला कोरड घशाला...भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांची पाण्यासाठी टाहो

चाकण ( पुणे ) : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भामा आसखेड धरणग्रस्तांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी तीन टीएमसी पाणीसाठा धरणामध्ये राखीव ठेवण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

धरण उशाला कोरड घशाला या उक्तीप्रमाणे भामा आसखेड धरणासाठी ज्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत,त्यांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही,पुनर्वसनाकरता पर्यायी जमिनी शासनाकडून देण्यात आलेल्या नाही तसेच पिण्याचे पाणी व शेतीसाठी राखीव जलसाठाही उपलब्ध नसल्यामुळे धरणाच्या पश्चिमेकडील गावे आंबोली,वेल्हावळे,खरवली,आखतुली,गडद, कोळीये,देशमुखवाडी,वहागाव,कोहिंडे,साबळेवाडी, वाघू,टेकवडी,अनावळे,कासारी,देवतोरणे,अहिरे, रौंदळवाडी,गवारवाडी,पापळवाडी,शिवे,वाकी आणि करंजविहिरे या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पाण्याविना शेती करपून चाललेली आहे.तसेच अनेक गावांमध्ये पिण्याचे पाण्याची ही टंचाई भासत आहे.याउलट प्रशासनाचे आवर्तन सोडण्याचे काम अगदी वेळेवरती चालूच आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या आज त्यांच्यावरतीच आत्महत्या करण्याची वेळ ओढवली आहे.धरणग्रस्त शेतकऱ्यांवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच भामा - आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा नव्याने आक्रमक पद्धतीने जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत असल्याचे प्रकल्प बाधित शेतकरी शंकर साबळे यांनी दिली.