मनोज जरांगे पाटील अपघातातून थोडक्यात बचावले... हॉस्पिटलमधील लिफ्ट कोसळली

 0
मनोज जरांगे पाटील अपघातातून थोडक्यात बचावले... हॉस्पिटलमधील लिफ्ट कोसळली

मराठा आरक्षणाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एका जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. बीडमधील शिवाजी राव क्रिटिकल केअर रुग्णालयात आज (दि.३) ला दुपारी १.३० च्या सुमारास त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना घडली. रुग्णाला भेटण्यासाठी लिफ्टने वर जात असताना, अचानक लिफ्ट कोसळली.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

* काय घडलं नेमकं? -

मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह रुग्णालयात दाखल असलेल्या एका समर्थक रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते.वॉर्डमध्ये जाण्यासाठी त्यांनी लिफ्ट घेतली.लिफ्ट पहिल्या मजल्यावर पोहोचताच ती अचानक जोरात तळमजल्यावर कोसळली.या दुर्घटनेने लिफ्टमध्ये असलेले सर्वजण क्षणभर हादरले.घाबरलेले समर्थक आणि जरांगे यांनी मदतीसाठी आवाज दिला.सुदैवाने,तळमजल्यावर उपस्थित असलेल्या व्यक्तीने तत्काळ लिफ्टचा दरवाजा फोडून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

* अपघातात कोणीही जखमी नाही, मात्र चौकशी सुरू

या अपघातात मनोज जरांगे पाटील व त्यांच्या समर्थकांना कोणतीही शारीरिक इजा झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे. रुग्णालय प्रशासनाने प्राथमिक चौकशी सुरू केली असून,लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला की क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये चढल्याने अपघात घडला,याचा तपास केला जात आहे.