स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून युवा सेनेची बैठक
चाकण ( पुणे ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेऊन खेड तालुका युवासेना ( शिंदे गट ) संघटनात्मक बांधणीसाठी चाकण शहरात नुकतीच कार्यकारिणी आढावा बैठक स्व.आ.सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालय येथे पार पडली.
बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर,युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे,युवासेना उपजिल्हाप्रमुख सम्राट देवकर,युवासेना जिल्हा सरचिटणीस महेश जाधव,युवासेना खेड तालुका प्रमुख विशाल पोतले,शिवसेना चाकण शहरप्रमुख माजी नगरसेवक महेश शेवकरी,युवासेना चाकण शहरप्रमुख अभिजीत जाधव,वाकळवाडी सरपंच नरेंद्र वाळुंज यांच्यासह चाकण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मयुर भुरूक आणि धनंजय पानसरे यांची चाकण उपशहरप्रमुख पदी सर्वानुमते निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले.
देशाच्या विकासासाठी तरूणांची भुमिका महत्तावाची आहे,हे लक्षात घेऊन युवक वर्गाला राजकारणात मोठ्या संधी मिळाव्यात यासाठी त्यांना पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनेच्या विस्तारासाठी विशेष कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.आगामी काळात युवासेना अधिक बळकट करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असेही यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा स्व.आ. सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी सांगितले.