औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले;सरपंचपद आरक्षण जाहीर

पुणे : खेड तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायत सरपंच पदांची आरक्षण सोडत २७ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या संदर्भात उपजिल्हाधिकारी,पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली. त्यात एकूण खेड तालुक्यातील एकूण १८ गावांचा समावेश आहे.
सरपंचपदाची आरक्षण सोडत झालेली गावे पुढीलप्रमाणे :-
१.खराबवाडी – सर्वसाधारण महिला,
२.जऊळके खुर्द – सर्वसाधारण,
३.कोहिंडे बुद्रुक – सर्वसाधारण,
४.सोळू – सर्वसाधारण,
५.वडगाव घेनंद – नागरिकांचा मागास प्रवर्ग,
६.धामणे – सर्वसाधारण,
७.गुळाणी – नागरिकांचा मागास प्रवर्ग,
८.रौंधळवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
९.आसखेड बुद्रुक – सर्वसाधारण महिला,
१०.आंबेठाण – अनुसूचित जमाती,
११.वाशेरे – सर्वसाधारण महिला,
१२.सायगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग,
१३.कडाचीवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
१४.बोरदरा – सर्वसाधारण महिला,
१५.पाईट – नागरिकांचा मागास प्रवर्ग,
१६.कोये – सर्वसाधारण महिला,
१७.खालुंब्रे – अनुसूचित जमाती महिला
१८.टेकवडी – सर्वसाधारण महिला
वरील प्रमाणे सरपंचपदांची आरक्षण सोडत झाली आहे.