फावड्याच्या लाकडी दांडक्याने तरुणास बेदम मारहाण;एक जण जखमी तर एकास अटक

पुणे नाशिक महामार्गावरील वाकीच्या भामा फाटा येथील घटना

 0
फावड्याच्या लाकडी दांडक्याने तरुणास बेदम मारहाण;एक जण जखमी तर एकास अटक

क्राइम | पुणे नाशिक महामार्गावरील संतोषनगर भाम फाटा येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाला फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना (दि.१३) मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली.या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गजानन चव्हाण (वय २६, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( दिनांक १३ मार्च २०२५ ) रोजी पहाटे सुमारे साडे पाच वाजण्याच्या सुमारास भाम फाटा येथे ही घटना घडली.

रोशन गवई (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) हा हर्षद नावाच्या व्यक्तीस शिवीगाळ करून हाताने मारहाण करत होता. त्यावेळी त्याने रिक्षामध्ये ठेवलेला लाकडी फावड्याचा दांडा घेऊन हर्षदच्या डोक्यात मारण्यासाठी धाव घेतली. हर्षदला वाचवण्यासाठी फिर्यादी लक्ष्मण चव्हाण यांनी आरोपीला दूर ढकलले. त्यावेळी आरोपीने संतापाच्या भरात फावड्याच्या दांडक्याने चव्हाण यांच्या डोक्यावर वार केला. तसेच त्यांच्या पोटावर नखांनी ओरखडे काढून त्यांना जखमी केले.

या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी रोशन गवई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बुरुड हे करीत आहेत.