भांबोली शाळेला हँडसमन कंपनीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन इमारत
चाकण ( पुणे ) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबोली ( ता.खेड ) शाळेला हँडसमन सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून दोन मजली शाळेचे बांधकाम, ग्राउंड,वॉल कंपाऊंड,खेळणी आदी शालेय सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत.
याप्रसंगी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ साहू यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी कंपनी अधिकारी, सरपंच, उपसरपंच,सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,शाळेचे शिक्षक,विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंपनीच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद शाळेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत भांबोलीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.कंपनीने सुसज्ज आणि सुविधा पूर्ण शाळा बांधकाम केल्याबद्दल ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला.