श्रमसंस्कार शिबिरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामजिक कामांचा शिकवण

 0
श्रमसंस्कार शिबिरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामजिक कामांचा शिकवण
श्रमसंस्कार शिबिरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामजिक कामांचा शिकवण

चाकण ( पुणे ) : येथील नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे कै.भागुबाई पिंगळे कला वाणिज्यविज्ञान रात्र महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर जैदवाडी ( ता.खेड ) येथे पार पडले. श्रमसंस्कार शिबिरातील सात दिवसांच्या कालावधीत विविध उपक्रम घेण्यात आले,यामध्ये सकाळ सत्रात प्रार्थना,विद्यापीठ गीत,एन एस एस गीत,योगा आणि ध्यानधारणा हे कार्यक्रम घेण्यात आले.

 जैदवाडी गावातील मंदिर परिसर,चावडी, ग्रामपंचायत परिसर,शाळा,स्मशानभूमी,रस्ते, पाण्याची टाकी,अंगणवाडी,ठाकरवस्ती या भागात स्वच्छता करण्यात आली.गावात श्रमदानातून मंदिराचे सुशोभीकरण,रस्त्यांची डागडुजी, गावातील ओढ्यांवर बंधारा,जलसाठयांची डागडुजी व स्वच्छता हे उपक्रम घेण्यात आले.

 व्याख्यानमालेत रावसाहेब ढेरंगे,प्रा.प्रफुल्ल पवार, प्रा.भास्कर महाराज जगदाळे,संतोष नायकोडी, प्रा.कैलास दौंडकर यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.सांस्कृतिक कार्यक्रमात प्रबोधनपर व जनजागृतीचे कार्यक्रमाबरोबर विविध नाटीका, पथनाट्ये,नृत्य,गायन,वादन,भजन,मनोरंजनपर खेळ असे कार्यक्रम घेण्यात आले.

शिबिर कालावधीत माजी पंचायत समिती उपसभापती सतीश राक्षे,मोजणी अधिकारी राहुल भोर,मारुती महाराज जैद,सोनबा जैद यांनी भेट दिली.

शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम पार पडला ‌कार्यक्रमात अध्यक्षपदी प्रा.दुधवडे सर होते.प्रा. ठोंबरे सर प्रा.साठे सर,‌प्रा.रसाळ सर उपस्थित होते.जैदवाडी गावचे सरपंच विकास जैद,माजी सरपंच राजुशेठ कातोरे,ग्रामपंचायत सदस्य विजय जैद,सोसायटी संचालक भगवान जैद, मुक्ताई ग्रुप अध्यक्ष सचिन जैद,अध्यक्ष कैलास कातोरे,शाखा अध्यक्ष मारुती जैद,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन जैद व जैदवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. 

शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य संतोष बुट्टे कार्यक्रम अधिकारी प्रा.केतन जैद,प्रा.भरत बिंरगळ,प्रा.गणेश शिंदे,प्रा.रोहिणी सोनवणे,प्रा. वैभव काकडे,प्रा.अनुजा कोऱ्हाळे,प्रा.सुनिता लबडे,प्रियांका फटांगरे,सुरज गारगोटे,प्रा.हर्षल शेवकरी या प्राध्यापकांनी पाहिले तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रोहन धनले, शुभम विश्वकर्मा, अंकिता वाळुंज,श्रेया येवले यांनी नियोजन केले.सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ,एन डी पिंगळे,संस्था सचिव डॉ.शीतल टिळेकर,संस्था संचालक डॉ संदेश टिळेकर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.