आळंदीत देशी बनावटीच्या पिस्तूलासह तरुणाला अटक
आळंदी ( पुणे ) : आळंदी - मरकळ रस्त्यावरील पीसीएस चौकाजवळ एका तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.२४) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ऋषिकेश अर्जुन माळी (वय.२२वर्षे,रा.जामनेर, जि.जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार विनोद आबासाहेब वीर यांनी सोमवारी (दि. २५) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी ऋषीकेश माळी हा आळंदी मरकळ रस्त्यावरील राज स्टील समोरील रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांनी पकडला.त्याच्याकडून किंमत ५२ हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.या प्रकरणी आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.