रांजणगाव गणपती येथे तिहेरी हत्याकांड; मृतांची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान
शिरुर ( पुणे ) : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथे महिला व दोन चिमुकल्याची हत्या झाली असून या तिघांचे डोक्यात कशाने तरी मारहाण करून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे मृतदेह जाळले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
या तिघा मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे फोटो टाकून आवाहन केले आहे.याबाबत कोणालाही माहिती असल्यास रांजणगाव पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन रांजणगाव पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.
रांजणगाव गणपती आर. के हॉटेलचे मागून खंडाळे गावाकडे जाणारे रोडवर येथे एक महिला (वय.अंदाजे २५ ते ३० वर्षे) व लहान मुलगा (वय. ४ वर्षे), दुसरे लहान बाळावे (वय.अंदाजे दीड वर्षे) यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी सहाय्याने डोक्यात मारहाण करुन खुन करुन मृतदेह अर्धवट जाळुन नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
एक महिला वय अंदाजे २५ ते ३० वर्षे,अंगात पिवळसर रंगाची साडी त्यावर लालसर फुले, गळ्यात मणीमंगळसुत्र, उजवे हाताचे मनगटावर बदाम त्यापुढे Mom Dad असे इंग्रजी मध्ये गोंदण, जय भिम असे मराठीत व पाठीमागील बाजुस बदामामध्ये इंग्रजीमध्ये R व S त्या पुढे Rajratan असे इंग्रजीमध्ये गोंदण, तसेच डावे हातावर फुलांची डिझाईन गोंदलेली.
सदर बाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास खालील अधिका-यांशी संपर्क करावा.
महादेव वायमोडे ( पोलीस निरीक्षक ) , मोनं.- 9420756782,पोसई अविनाश थोरात, मोनं.- 8888828261रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन मोनं.- 9552287100
सदर माहिती देणा-याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल व योग्य ते बक्षिस देण्यात येईल.