कुटुंबाचा आधारवड हरपला! शिंदे गावच्या आदर्श माता अलकाबाई टेमगिरे काळाच्या पडद्याआड
चाकण | शिंदे गावातील पानमंद परिवारात अलकाबाई यांचा जन्म झाला होता.विवाहानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य टेमगिरे परिवाराच्या संसारासाठी समर्पित केले.संसाराचा गाडा सांभाळताना त्यांनी पतीला शेती आणि दुग्धव्यवसायात मोलाची साथ दिली. त्यांचे पती कॅडबरी कंपनीत नोकरीला असल्याने शेतीची तसेच मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कुटुंबाच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि केलेला त्याग कायम स्मरणात राहील.
एक कर्तव्यदक्ष पत्नी, प्रेमळ माता आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने टेमगिरे परिवाराने एक प्रेमळ आधारवड गमावला आहे.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, पाच मुली, जावई, पुतणे, दीर, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!