पुण्यातील राजकीय आंदोलनात पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ खेड तालुका पत्रकार संघाकडून निषेध

 0
पुण्यातील राजकीय आंदोलनात पत्रकारांवरील  हल्ल्याच्या निषेधार्थ खेड तालुका पत्रकार संघाकडून निषेध

सह्याद्री LIVE | पुण्यातील कॉंग्रेस आणि भाजपा या दोन राजकीय पक्षांमधील आंदोलनामध्ये झालेल्या दगडफेकीत माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे दोन पत्रकार जखमी झाल्याच्या निषेधार्थ खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी(दि.१७ ) नोंदविला निषेध नोंदविण्यात आला.उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले निवेदन देण्यात आले.

यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. निलेश आंधळे, सल्लागार वनिता कोरे, बाळासाहेब सांडभोर, महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अतुल भालेराव, सुनील थिगळे, खजिनदार प्रभाकर जाधव, कायदेशीर सल्लागार सोमनाथ नवले, रोहिदास गाडगे, प्रसिद्धी प्रमुख नाजिम इनामदार, रामचंद्र सोनवणे, सदाशिव आमराळे आदी सदस्यांची उपस्थिती होती. 

पुणे येथील काँग्रेस भवनासमोर कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील आंदोलनाची बातमी कव्हर करण्यासाठी असलेल्या पत्रकारांवरही हल्ला झाला होता. 

- खेड तालुका पत्रकार संघाकडून निषेध…