मुंबई उद्योग नगरीत भामा खोऱ्याच्या नागरिकांनी जपला वारकरी संप्रदायाचा विचार
नवनिर्वाचित जि.प.सदस्या सुनीता बुट्टे पाटील आणि पं. स.सदस्या श्रद्धा मांडेकर यांचा सन्मान
अध्यात्मिक | संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ,सात बंगला,अंधेरी, मुंबई यांच्या वतीने खेड तालुक्यातील पाईट- आंबेठाण जिल्हा परिषद गटातून निवडून आल्याबद्दल जिल्हा परीषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील व आंबेठाण गणाच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या श्रद्धा मांडेकर यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
मुंबई अंधेरीच्या सातबंगला येथे खेड तालुक्यातील पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील अनेक गावचे मतदार नागरिक रहिवाशी असून त्यांचे संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आहे.जगदगुरु संत तुकाराम महाराज बीजे निमित्त मंडळाचे वतीने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कार्यक्रमात सुनीता बुट्टे पाटील व श्रद्धा मांडेकर यांचा सत्कार मंडळाचे वतीने करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.कृष्णा महाराज चवरे यांचे कीर्तन झाले.१९९० साली सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला शरद बुट्टे पाटील सन २००० पासून सप्ताहाला दरवर्षी भेट देत आहेत.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील निवडून आल्याने मंडळाचे वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार नागरीकांच्या उपस्थितीत झाला.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील,माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर,शिवाजी डावरे,उद्योजक गोविंद घाटे,मंडळाचे अध्यक्ष शामराव रौंधळ,किसन आवारी,मारुती पवार,हभप रोहिदास रौधळ,संतोष बच्चे,सचिन शिवेकर,नामदेव शिवेकर,मारुती कोळेकर,सरपंच निर्मला कोळेकर,सुमन रौंधळ,मीना बच्चे,सुषमा रौधळ आदीसह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
* खेडच्या पश्चिम पट्ट्यायील नागरीक उद्योग व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेल्यानंतर देखील मुंबई उद्योग नगरीमध्ये वारकरी संप्रदायाचा विचार अखंड हरीनाम सप्ताहाच्या माध्यमातून कृतीत ठेवला आहे.धार्मिक कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग ही बाब विशेष आहे. - शरद बुट्टे पाटील - माजी सभापती,जि.प.पुणे.