पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपाकडून स्वच्छता अभियान

 0
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपाकडून स्वच्छता अभियान
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपाकडून स्वच्छता अभियान

चाकण ( पुणे ) : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी खेड ग्रामीणच्या वतीने स्वच्छता अभियान श्री क्षेत्र कुंडेश्वर,पाईट येथे राबविण्यात आले आहे.

याप्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील,जिल्हा सरचिटणीस संजय रौधळ,खेड ग्रामीणचे अध्यक्ष सुनिल देवकर,खेड तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष काळूराम पिंजन,पिंपरी पाईट जिल्हा परिषद गट अध्यक्ष रोहित डावरे,माजी आदर्श सरपंच दत्तात्रय मांडेकर, शिवाजी डावरे,माजी उपसरपंच शरद निखाडे, रामदास खेंगले आदी उपस्थित होते. 

स्वच्छाता अभियान पूर्ण करून बुद्धीजीवी महिला पुरुषांचा कार्यक्रम घेऊन त्यांना आहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील पत्रक देण्यात आली. ऑनलाईन निबंध स्पर्धाही घेण्यात येत आहे. त्यासाठी बक्षिस आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.अशी मागणी खेड तालुका ग्रामीण अध्यक्ष सुनील देवकर यांनी दिली.