महिला दिनाच्या निमित्ताने आर्थिक दृष्ट्या दुर्बल विधवा महिलांचा सन्मान
पिंपरी चिंचवड ( पुणे ) : वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल विधवा महिलांचा ओटी भरण आणि सत्कार समारंभ करण्यात आला होता.
समाजात अशा बऱ्याच महिला आहेत ज्या एकल आहेत म्हणजे विधवा आहेत.समाज अंधश्रद्धेपोटी त्यांना शुभ कार्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.यामध्ये अनेक महिला आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल आहेत.यातील काहीना स्वतःच्या शिक्षणाचा स्तर वाढवावा लागला तसेच काही महिलांना टेक्निकल शिक्षण सुद्धा घ्यावे लागले.परंतु परिस्थिती पुढे हार न मानता त्या झगडत राहिल्या व आपल्यासोबत आपल्या सासू-सासरे व मुलांचा सांभाळ करत आहेत.
अश्या जगाला प्रेरणा देणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल जवळपास १०० हून अधिक विधवा महिलांचा साडी चोळी,नारळ,ओटी भरून पुष्पगुछ व विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.गीतांजली क्षीरसागर,अनेक पुरस्कार प्राप्त,केंद्रीय फिल्म सल्लागर समिती सदस्या डॉ. स्मिता बारवकर,महवितरण अभियंता शीतल मेश्राम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी नारदीय कीर्तनकार अमृता देशपांडे यांचे महिला प्रबोधन पर्व व्याख्यान झाले.
अध्यक्ष मधुकर बच्चे,सचिव जयंत कुलकर्णी,सचिव मंगला डोळे -सपकाळे,उपाध्यक्षा सोनाली मन्हास,खजिनदार दिलीप चक्रे,माजी अध्यक्ष सलीम सय्यद,शंकरराव कुलकर्णी,श्रीनिवास जोशी,अवधूत कुलकर्णी,रंगाराव,दिलीप पेटकर, दारासिंग मन्हास,रवींद्र काळे,रवींद्र सागडे,विलास गटणे,अर्जुन पाटोळे,सोनाली शिंदे,सोनाली डावरे, भास्कर पाखले,अनिल शिंदे,अरविंद पाटील, धनराज गवळी,खुशाल दुसाने,सौ.गवळीताई,रेखा दुसाने,अपर्णा कुलकर्णी,वासंती काळे,शीला चक्रे, सरिता कुलकर्णी, रंगा राव,सौ पेटकर आदींनी हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा घेतला.
वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी प्रास्थाविक केले तर सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका फाउंडेशन सचिव मंगला डोळे - सपकाळे यांनी केले.उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सर्वांचे आभार मानले.
०००००