मशीन देतो असे सांगून चाकण येथे एकाची चार लाख रुपयांची फसवणूक
चाकण (पुणे) : एम्ब्रॉयडरी मशीन देतो असे सांगून एका महिलेची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चाकण,दावडमळा (ता.खेड) येथे घडला आहे.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दयानंद फकिरप्पा कुंभार (वय ४२ वर्षे,रा.आंबेठाण रोड,दावडमळा चाकण,ता.खेड,जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीचे मॅनेजर गणेश नाथगोसावी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दयानंद कुंभार यांच्या पत्नीला आरोपी गणेश याने IKONIXS- १२०१ Embroidery Machine ची माहिती फिर्यादीला देवून ही मशीन तुम्हाला देतो असे सांगून विश्वास संपादन करत (दि.२५/०१/२०२५ रोजी ते दि.२५/०८/२०२५) या कालावधीत वेळोवेळी ३ लाख,८९ हजार ५२० रुपये घेतले.परंतु ही मशीन न देता फसवणूक केली आहे.पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.