दुचाकी दुभाजकला धडकून एक ठार तर दोन गंभीर जखमी;एकावर गुन्हा दाखल

 0
दुचाकी दुभाजकला धडकून एक ठार तर दोन गंभीर जखमी;एकावर गुन्हा दाखल

सह्याद्री DIGITAL NEWS| दुचाकीवरुन ट्रिपल सीट भरधाव वेगाने चालवत जाणाऱ्या चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्यभागी बसवलेल्या दुभाजकला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील मागील सीटवर बसलेल्याचा अपघाती मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना (दि.१४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वासूलीफाटा ते एचपी चौक दरम्यानच्या मार्गावर घडली आहे.

 उमेशकुमार परदेशीराम कुंभार (वय.२७, सध्या रा. वासुलीफाटा ता.खेड,जि.पुणे मुळ रा.निलतारा ता.जि.विलासपुर राज्य छतिसगड) याने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 तरुण राजु कोसले (वय.२३,सध्या रा. वासुली फाटा ता.खेड,जि.पुणे,मुळ रा. ३९५ वॉर्ड नंबर १२, आमराया फरा कुर्णा छतिसगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी उमेशकुमार आणि मृत रामसेवक पाल हे तरुण कोसले यांच्या दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना आरोपीने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करुन चालवून मोटर सायकल रस्त्याचे मध्यभागी असलेल्या दुभाजकला धडकल्याने धडकवुन अपघात झाला.यात मोटर सायकलवर मध्यभागी बसलेला फिर्यादी व पाठीमागे बसलेला रामसेवक गंगाप्रसाद पाल (वय २४ ) यांचेसह तिघांचे डोक्याला, हाता-पायाला, तोंडाला गंभीर दुखापती होवून रामसेवक याचा मृत्यु झाला आहे.पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.