ट्रॅक्टर चोरटा जेरबंद;तब्बल सतरा लाख रुपयांची दोन वाहने जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई

चाकण ( पुणे ) : महाळुंगे एमआयडीसी हद्दीतील निघोजे येथून घरासमोर पार्किंग करण्यात आलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद करून दोन गुन्हे उघडकीस आणत तब्बल सतरा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे.
अमर रामदास येळवंडे (वय.२५ वर्षे,जामदार वस्ती,निघोजे,ता.खेड ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत उध्दव कडलग (वय.२८ वर्षे,रा.जवळे कडलग,ता.संगमनेर,जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमधील जामदारवस्ती,निघोजे येथून घरासमोर पार्किंग करण्यात आलेला सात लाख रुपये किंमतीचा महिंद्रा कंपनीचा सरपंच ८८५ ट्रॅक्टर नंबर (एम एच १४ जे एम ११६४ ) असा ट्रॉलीसह अज्ञात चोरट्याने (दि.१२ ) पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास चोरून नेला होता.तपास पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळ ते सत्तर किलोमीटर अंतरावरील आळेफाटा दरम्यानचे सीसीटिव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली.त्याआधारे आरोपी अनिकेत याला जवळे कडलक येथून ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने ट्रॅक्टर आणि जाधववाडी,चिखली येथून महींद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप असा एकुण १७,००,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन गिते,पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण कांबळे,सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे,राजु जाधव,राजेंद्र कोणकेरी,अमोल बोराटे, युवराज बिराजदार,विठ्ठल वडेकर,तानाजी गाडे, किशोर सांगळे,संतोष काळे,शिवाजी लोखंडे, मंगेश कदम,राजेंद्र खेडकर,संतोष वायकर,गणेश गायकवाड,अमोल माटे,राजेश गिरी,शरद खैरे यांनी केली आहे.