देशी बनावटीचे पिस्तूलासह एका इसमास गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलीसांकडून अटक

 0
देशी बनावटीचे पिस्तूलासह एका इसमास गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलीसांकडून अटक

चाकण ( पुणे ) : बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने एमआयडीसीतील एका कंपनीजवळ तरुणास ( दि.६ ) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निघोजे (ता.खेड ) येथे जेरबंद केले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. 

 आकाश बाळु थोरात (वय.२६ वर्षे,रा.आरोग्यम हॉस्पीटलजवळ,चाकण,ता.खेड,जि.पुणे) यास अटक करण्यात आली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमधील महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश थोरात हा पिस्तुल घेऊन निघोजे गावच्या हद्दीतील सावली हॉटेल येणार आहे.त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी सापळा रचून सदर आकाश यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडतीत पॅन्टमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल मॅक्झीनसह मिळुन आले.तसेच खिशात ०१ जिवंत काडतुसे मिळून आले आहे.

 युनिट तीनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार हनुमंते,यदु आडारी,मनोज साबळे,सोनवणे,दांगट,जैनक आदींनी ही कारवाई केली.

०००००