पाईट - आंबेठाण जिल्हा परिषद गटात‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती'ची थेट लढत;राष्ट्रवादीच्या झंझावाती प्रचाराने विरोधकांची धावपळ
ZP ELECTION | खेड तालुक्यातील पाईट - आंबेठाण जिल्हा परिषद गटात निवडणूक जशी जवळ येत आहे,तसतसे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनीता बुट्टे पाटील यांनी पाईट गणातील उमेदवार पल्लवी दरेकर आणि आंबेठाण गणाच्या उमेदवार श्रद्धा मांडेकर यांच्यासह झंझावाती प्रचाराच्या जोरावर निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
जनतेशी थेट संपर्क,गावोगावी होणाऱ्या कोपरा सभा आणि होम टू होम भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांचा प्रचार अधिक आक्रमक आणि परिणामकारक ठरत आहे.परंतु विरोधातील उमेदवार प्रचंड पैसा,बळजबरी,प्रलोभने आणि अफवांच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.उमेदवार सुनीता बुट्टे पाटील यांनी पती माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या वीस वर्षांच्या निष्कलंक समाजसेवेचा थेट हिशेब जनतेसमोर मांडला आहे.“माझ्या पतीने भामा खोऱ्यासाठी काय केलं,ते त्यांचं काम बोलत आहे,”अशी ठाम भूमिका जनते समोर मांडत आहे. यामुळे गटाचे उमेदवार सुनीता बुट्टे पाटील,गणाचे उमेदवार पल्लवी दरेकर आणि श्रद्धा मांडेकर यांच्या विजयासाठी मतदारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
* स्थानिक विरुद्ध आयात उमेदवार -
निवडणुकीत स्थानिक विरुद्ध आयात उमेदवार हा मुद्दा ठळकपणे समोर आला असून,भामा खोऱ्याची जाण नसलेल्या आणि केवळ निवडणुकीपुरते मतदारसंघात अवतरलेल्या उमेदवारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “पैशाने मतं विकत घेणाऱ्यांपेक्षा,आमच्या अडीअडचणींमध्ये उभा राहणारा नेता हवा,”अशी आक्रमक प्रतिक्रिया अनेक गावांतील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.पाईट - आंबेठाण जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक आता केवळ राजकीय स्पर्धा राहिलेली नसून, प्रामाणिक काम विरुद्ध पैसा, सेवा विरुद्ध सत्ता, आणि स्थानिक नेतृत्व विरुद्ध आयात उमेदवार अशी निर्णायक लढाई होत आहे.