चाकणला अक्षयदादा जाधव युवामंचकडून दहीहंडी उत्सव; ५,५५,५५५ रुपये बक्षीस

 0
चाकणला अक्षयदादा जाधव युवामंचकडून दहीहंडी उत्सव; ५,५५,५५५ रुपये बक्षीस
चाकणला अक्षयदादा जाधव युवामंचकडून दहीहंडी उत्सव; ५,५५,५५५ रुपये बक्षीस

चाकण ( पुणे ) : अक्षयदादा जाधव युवामंच आणि अश्वमेघ फाउंडेशन आयोजित चाकण (ता. खेड) येथे भव्य दिव्य दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि.१६) केले आहे. दहीहंडी उत्सवासाठी लाख ५५ हजार ५५५ रुपये बक्षीस ठेवले आहे. तसेच या उत्सव कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून बॉय श्री सिनेमातील अभिनेत्री विदुला चौगुले आणि ३६ गुणी जोडी मधील गाजलेली अभिनेत्री अनुष्का सरकटे, लग्नाची बेडी मधील प्रसिद्धीच्या झोतातील अभिनेत्री सायली देवधर व प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा स्नेहल पवार (मुंबईकर) येणार आहेत.

खेड तालुक्यातील उभरते नेतृत्व, उद्योजक अक्षय जाधव यांच्याकडून दरवर्षी महिलांसाठी मोठ्या शहरात मानाची पैठणी कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच गोकुळाष्टमी या दिवशी दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो. यावर्षी देखील अक्षय जाधव यांनी दहीहंडी उत्सवाचा भव्यदिव्य कार्यक्रम चाकण येथील पुणे नाशिक हायवेच्या ग्रँड सेंट्रल शेजारी मैदानावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे. चित्रपट व मालिकेतील प्रसिद्ध असलेल्या चार अभिनेत्री येणार असल्याने दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. आठ ते नऊ थरावर लावलेली दहीहंडी फोडण्यासाठी पुणे,मुंबई,ठाणे,अहिल्यानगर, नाशिक आदी जिल्ह्यातील नामवंत गोविंदा पथक येणार आहेत. दहीहंडी फोडण्याचा गोविंदा पथकांचा थरार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. खेड तालुक्याच्या चाकण शहरात पहिल्यांदा सर्वात मोठे बक्षीस असलेली दहीहंडी अक्षयदादा जाधव युवामांच व अश्वमेघ फाउंडेशनची ठरणार असल्याने तरुण, महिला यांची मोठी गर्दी कार्यक्रमासाठी असणार आहे.दहीहंडी उत्सवासाठी भव्य स्टेज व लायटिंग व्यवस्था केल्याने कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होणार आहे. अभिनेत्री सोबत सेल्फी घेण्याची मजा देखील महिला वर्गाला मिळणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन अक्षयदादा जाधव युवामंच व अश्वमेघ फाउंडेशनच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केले आहे.