चाकण दक्षिण पोलिसांची कारवाई; सराईत दुचाकी चोर अटकेत, ४ दुचाकी जप्त
सह्याद्री LIVE | चाकण हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली.त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी शुभम मधुकर खामकर याला पोलीस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.पोलीस पथकाने सुमारे ६० ते ६५ सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार खामकर यास ताब्यात घेण्यात आले.अधिक चौकशी केली असता त्याने चाकण,दिघी व हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील,शिवाजी चव्हाण,प्रकाश नवले,मंगेश फापाळे,सुनील भागवत,रेवन्नाथ खेडकर,अमोल माटे,गजानन चव्हाण,आदम शेख यांनी केली.