चाकण औद्योगिक वसाहतमधील कंपनी अधिकाऱ्याच्या गाडीवर सहा जणांच्या टोळक्याचा हल्ला

चाकण ( पुणे ) : कामावर लेबर वेळेवर येत नसल्याची तक्रार मनुष्यबळ विकास अधिकाऱ्यास करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यास रस्त्यात अडवून सहा जणांच्या टोळक्याने मारण्याच्या उद्देशाने चारचाकी गाडीवर हल्ला करणाऱ्या सहा जणांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
अंकुर दिवाकर कुलकर्णी (वय.४२ वर्षे,मोशी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १.गौरव अन्नु पटेल (वय.२१ वर्षे,रा.आधार तानचौक,ता.आधार तानचौक,जि जबलपुर, मध्यप्रदेश),२.अजय राम सुशिल पटेल (वय.२२ वर्षे,रा.गदीरा,पो मढगाव,जि रिवा,मध्यप्रदेश),३.संदिप अशोक सोनकर (वय.२३ वर्षे,रा.फोलपुर,ता.मरिंनगंज,जि.अजमगढ,उत्तरप्रदेश),४.विकास राममिलन सोनकर (वय.१९ वर्षे,रापुलपुर,ता.मारिंगंज,जि.अजतगढ,उत्तरप्रदेश),५.हर्षद विलास चौधरी (वय.२८ वर्षे,रा.खरपुडी बु. ता.खेड,जि.पुणे),६) रोहीत पटेल (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक क्षेत्रातील भारत टेक्नो प्लॉस्ट प्रा.ली कंपनी ( खराबवाडी,ता.खेड ) येथील कंपनीत कामगार वेळेवर कामावर येत नसल्याची तक्रार केल्याचा राग आल्याने फिर्यादी हे (दि.२५ ) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या टाटा पंच (एमएच १२ यु सी ०६८८) या चारचाकीतून घरी जात असताना,दुकाचीवरून आलेल्या अजय पटेल याने गाडी अडवून शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीचे गाडीचे समोरील काचेवर मारले.तसेच पाठीमागून कंपनीत काम करणारे कामगार गौरव,संदीप,विकास,हर्षद आणि रोहित गाडीच्या दिशेने पळत येऊन त्यांचे हातातील लोखंडी रॉड आणि लाकडी काठयांनी फिर्यादीचे गाडीचे सर्व बाजूने काचेवर मारून गाडीच्या सर्व काचा फोडत दहशत माजवून विकास याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या मानेवर फटका मारला.पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस करत आहेत.