धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक अन् मानवी अवशेष सापडल्याने खळबळ

 0
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक अन् मानवी अवशेष सापडल्याने खळबळ
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक अन् मानवी अवशेष सापडल्याने खळबळ

पुणे : दौंड तालुक्यात बोरावकेनगरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक व मानवी अवशेष सापडल्याची माहिती समोर आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात बोरावकेनगरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक व मानवी अवशेष सापडल्याची माहिती समोर आल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी करण्यात आली आहे.पोलिसांनी याचा तपास व रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे.

 अधिक माहितीनुसार, दौंडच्या बोरावकेनगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ६ ते ७ मृत अर्भकांचे अवशेष आढळून आले.त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.दौंड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी २०२० पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती आहे. राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थिती दर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.