नागरिकांच्या समस्यांसाठी चाकणला भाजपचा मदत कक्ष

 0
नागरिकांच्या समस्यांसाठी चाकणला भाजपचा  मदत कक्ष

सामाजिक | नागरिकांना महसूल,वीज,पोलिस प्रशासन,नगररिषद तसेच विविध शासकीय योजनांबाबत भेडसावणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण व्हावे, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने चाकण येथील ग्रामवैभव इमारत, नगरपरिषद परिसरात ‘मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे.

याप्रसंगी भाजप खेड तालुका अध्यक्ष भगवान मेदनकर,जिल्हा सरचिटणीस प्रिया पवार, सरचिटणीस संदेश जाधव,उपाध्यक्ष बाळासाहेब भोपे, सहकार आघाडी तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे,प्रितम शिंदे,युवा मोर्चा चाकण मंडल अध्यक्ष धिरज वाळुंज, युवा मोर्चा सरचिटणीस नसीम पठाण, अल्पसंख्यांक मोर्चा चाकण मंडल अध्यक्ष शार्दुल पठाण, माजी शहराध्यक्ष दत्ता परदेशी, प्रवक्ते प्रवीण करपे, दक्षिण भारतीय आघाडी चाकण मंडल अध्यक्ष गणपती गौडा पाटील, वाहतूक आघाडी उपाध्यक्ष संतोष ओतारी, समीर शेख यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या मदत कक्षामार्फत नागरिकांना महसूल विभागातील दाखले, वीज वितरणाशी संबंधित तक्रारी, पोलिस स्टेशनमधील प्रलंबित प्रश्न, नगरपरिषद प्रशासनाशी निगडित अडचणी तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यासाठी मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

खेड तालुका भाजप अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, “सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेरफटक्यांमुळे त्रास सहन करावा लागू नये, यासाठी पक्षाच्या माध्यमातून हा मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्ष कटिबद्ध आहे.”