वूई टुगेदर फाउंडेशनकडून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कामगारांचा सन्मान
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी दिली.
संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत होताम्य प्राप्त झाले त्या सर्वांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सचिन कांबळे,अध्यक्ष मधुकर बच्चे,सल्लागार रवींद्र सागडे,उपाध्यक्ष सोनाली मन्हास,सलीम सय्यद,दिलीप चक्रे,जयंत कुलकर्णी,क्रांतीकुमार कडूलकर, खुशाल दुसाने,जावेद शेख,दिलीप पेटकर,मुकुंद इनामदार,सदाशिव गुरव,शंकर कुलकर्णी,विलास गटने,दारासिंग मन्हास,गणेश जगताप, पाटील काका,इजहार शेख,अर्चना बच्चे,पोपट बच्चे आदी उपस्थित होते.
स्वानंद राजपाठक,संतोषी कदम/पाटील,गौतम थोरात,गणेश जगताप,इजहार शेख,सचिन कांबळे ,करण कोळी आदींचा कामगारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मन्हास यांनी केले.तर दिलीप चक्रे यांनी आभार मानले.