येलवाडी येथील रस्ते आणि प्रकाशव्यवस्थेसाठी तब्बल ८३ लाख रुपयांचा निधी

माजी आमदार मोहिते पाटलांच्या हस्ते कामांना सुरुवात

 0
येलवाडी येथील रस्ते आणि प्रकाशव्यवस्थेसाठी तब्बल ८३ लाख रुपयांचा निधी

चाकण : येलवाडी (ता. खेड) गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देत पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध शासकीय निधींतून मंजूर झालेल्या तब्बल ८३ लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन शुभारंभ खेड-आळंदी विधानसभेचे आमदार माजी दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषद सदस्य सदस्य पै.गणेश बोत्रे, येलवाडीचे सरपंच तथा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रणजीत गाडे,उपसरपंच मनीषा जाधव,विक्रम बोत्रे,अतुल गाडे, अनिकेत गाडे,प्रदीप गायकवाड ,प्रशांत गाडे,सुधीर गाडे,गोवर्धन बोत्रे,सुजाता गाडे,उर्मिला गायकवाड, प्रज्ञा बोत्रे,बेबीताई पाटोळे,योगिता गाडे,मनीषा चौधरी, सुधीर गाडे,गोवर्धन बोत्रे,प्रशांत गाडे, अशोक बोत्रे,अनिल बोत्रे,जीवन बोत्रे, सचिन गाडे, समीर भसे, सोमनाथ भसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येलवाडी गावच्या विकासकामांमध्ये दळणवळण आणि प्रकाश व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे.येलवाडी मुख्य कमान ते ग्रामपंचायत या महत्त्वाच्या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समिती (३३ लाख), ग्रामनिधी (२० लाख),बांधकाम समिती (१० लाख),समाज कल्याण निधीअंतर्गत (१० लाख) रुपयांचे रस्ता काँक्रीटीकरण आणि (१० लाख) रुपयांची हायमास्ट प्रकाश व्यवस्था आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने जनहिताच्या विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. येलवाडीच्या विकासाच्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, गावाचा कायापालट करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही,असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले.