नाट्य लेखक नारायण करपे यांच्या जनजागृती नाट्य पुस्तकाचे प्रकाशन

चाकण ( पुणे ) : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडदचे पदवीधर शिक्षक नारायण करपे यांनी लेखन केलेल्या जनजागृती या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्षा नीलमताई शिर्के ,सामंत यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धेच्या बक्षीस वितरणेच्या निमित्ताने पुणे येथील अण्णासाहेब साठे नाट्यगृहामध्ये झाले.
यावेळी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर,डायटचे प्राचार्य एन पी शेंडकर,वरिष्ठ अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर,सुवर्णा तोरणे, नाट्यसमितीचे अध्यक्ष हनुमंत कुबडे, गिरीश भुतकर,कार्याध्यक्ष शंकराव घोरपडे, सचिव प्रकाश खोत, संजीव मांढरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नारायण करपे यांनी जनजागृती नाटकीच्या पुस्तकामध्ये प्रबोधन पर नाटकावर जास्त भर देऊन वास्तव उभे केले आहे.