तिने जिद्दीने केले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण;शेलू गावची पहिली महिला डॉक्टर

 0
तिने जिद्दीने केले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण;शेलू गावची पहिली महिला डॉक्टर

चाकण ( पुणे ) : इच्छा असेल तर मार्ग दिसेल... याउक्ती प्रमाणे दुर्गम भागातील काजल पडवळ या युवतीने घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना देखील नामवंत महाविदयालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. गावातच नव्हे तर पंचक्रोशीत पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला.या यशस्वी वाटचालीमुळे काजळचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 खेड तालुक्यातील चाकणच्या पश्चिम भागातील शेलू गाव.गावात फक्त प्राथमिक शिक्षणाची सुविधा अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षणानंतर शालेय व महाविद्यालयीन शिक्षण भामचंद्र विद्यालय ( भांबोली ) येथे घेतले.राजगुरूनगर येथे पदवीधर झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण करून ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.गुणवत्ता व चिकाटी या जोरावर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जेजे रुग्णालयात तून आपले MBBS चे शिक्षण पूर्ण केले असून तिने शेलू गावातील पहिली महिला डॉक्टर बनण्याचा मान मिळवला. काजलचे  आजोबा कै.किसन भागुजी पडवळ,आई द्वारका,  वडील मोहन पडवळ यांचे स्वप्न पूर्ण केले.

लहानपणापासूनच तिची डॉक्टर बनण्याची इच्छा होती.आपले आई वडील व शिक्षकांच्या आशीर्वादाने शेतकरी कुटुंबातील निरक्षर आई वडिलांची मुलगी यशस्वी होऊ शकते.असे उदाहरण काजलने समजासमोर ठेवले आहे.शेलू व पंचक्रोशीच्या वतीने झालेल्या सत्कार कार्यक्रमात भविष्यकाळात समाजोपयोगी कामे रुग्णांची सेवा काजलने करावीत,अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.