नाट्यस्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडद जिल्ह्यात प्रथम क्रमांक

 0
नाट्यस्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडद जिल्ह्यात प्रथम क्रमांक

चाकण ( पुणे ) : खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडद येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये सादर केलेल्या आर्यनची कमाल अज्याची धमाल या नाटकाचा जिह्यात प्रथम क्रमांक आला. 

 पुणे येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षा बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के,सामंत शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर,डायटचे प्राचार्य एनपी शेंडकर,बाल रंगभूमी पुणेचे अध्यक्ष दिपालीताई शेळके, वरिष्ठ अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर,सुवर्णा तोरणे, नाट्यसंयोजन समितीचे अध्यक्ष हनुमंत कुबडे,ज्येष्ठ मार्गदर्शक गिरीश भुतकर,नाट्य संयोजन समितीचे कार्याध्यक्ष शंकरराव घोरपडे,सचिव प्रकाश खोत, सदस्य संजीव मांढरे, किशोर भगत यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

 समृद्धी शिंदे,मंगेश शिंदे,तन्मय कावडे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभिनयाचे तर जिल्हा उत्कृष्ठ दिग्दर्शन - लेखन नारायण करपे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाटकाचे लेखन नारायण करपे केले.नेपथ्य तानाजी म्हाळुंगकर यांनी तर रंगभूषा,वेशभूषा, प्रकाश योजना संदीप कचाटे यांनी केले. नाटकामध्ये मंगेश शिंदे,सार्थक शिर्के,स्वराज शिंदे, स्वप्निल शिंदे,तन्मय कावडे,विघ्नेश चिखले,समृद्धी शिंदे,आरोही शिंदे आणि आरोही शिर्के या विद्यार्थ्यांनी अभिनय केला.

नाटकातील मुलांचे कौतुक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे,गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले विस्ताराधिकारी राजेश जंगले,केंद्रप्रमुख मुख्याध्यापक प्रमोद पारधी,माजी पंचायत समिती सभापती मंदाबई सखाराम शिंदेगडद गावचे सरपंच चंद्रकांत शिंदे,माजी सरपंच रामदास शिंदे,मारुती तळेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे,माजी अध्यक्ष तुकाराम शिंदे,पालक नारायण शिंदे आणि ग्रामस्थांनी केले.