शिवे - वाकी तर्फे वाडा संयुक्त ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निर्मला कोळेकर

 0
शिवे - वाकी तर्फे वाडा संयुक्त ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निर्मला कोळेकर
शिवे - वाकी तर्फे वाडा संयुक्त ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निर्मला कोळेकर

सह्याद्री LIVE | भामनेर खोऱ्यातील प्रमुख एक असलेल्या शिवे - वाकी तर्फे वाडा संयुक्त ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निर्मला मारुती कोळेकर यांची निवड झाली आहे.

मावळत्या सरपंच कविता संतोष शिवेकर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.नऊ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये ५ - ४ असे बलाबल होते.परंतु एका सदस्याला जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठेवल्याने ग्रामपंचायतमध्ये ८ सदस्य निवडणुकीवेळी उपस्थित होते. 

सरपंच पदासाठी निर्मला मारुती कोळेकर आणि दीपाली लहू कोळेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.गुप्त मतदानात दोन्ही उमेदवारांना समसमान मतदान झाल्याने चिठ्ठीने निर्मला मारुती कोळेकर यांची निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलधिकारी राजेंद्र वढणे यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामपंचायत अधिकारी उल्हास कोरडे यांनी सहकार्य केले.

शिवे वाकी संयुक्त ग्रामपंचायतमध्ये प्रथमच वाकी गावाला सरपंचपद मिळाले असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.