राजकीय | संतोषनगर सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास पारधी बिनविरोध;उपाध्यक्षपदी काळूराम पवार

 0
राजकीय | संतोषनगर सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास पारधी बिनविरोध;उपाध्यक्षपदी काळूराम पवार

चाकण : संतोषनगर (ता.खेड) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास पारधी तर उपाध्यक्षपदी काळूराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटीच्या पुढील वाटचालीसाठी एकमताने नेतृत्व निश्चित झाल्याचे दिसून आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, राजगुरूनगर बँकेच्या माजी अध्यक्षा विजया शिंदे,शांताराम शेटे,यशवंत भोसले,मनोहर वाडेकर,प्रमोद कड,दिनेश कड, बळवंत गारगोटे,स्वप्नील पारधी,डॉ. सागर सोमवंशी,अंकुश गारगोटे,उषाताई कड,अशोक कड,पोपट कड,शांताराम कड,शुभांगी सातकर, मनोहर कड आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सोसायटीच्या विकासासाठी पारदर्शक कारभार,शेतकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नुतून अध्यक्ष कैलास पारधी यांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरवून सोसायटीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे, आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखणे आणि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा सदस्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

या बिनविरोध निवडीमुळे संतोषनगर परिसरात एकोप्याचा संदेश गेला असून, येत्या काळात सोसायटीच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.या निवड प्रक्रियेदरम्यान स्थानिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.