CRIME | चाकण - महाळुंगे पोलिसांच्या हद्दीत दमदार कारवाई

सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

 0
CRIME | चाकण - महाळुंगे पोलिसांच्या हद्दीत दमदार कारवाई

चाकण : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांवर मोठी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यांतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

*कारवाईतील मुख्य आरोपी -

१) रामदास मारुती साळुंके (वय ३७, आंबेठाण)

 खून, अपहरण, दरोड्याची तयारी, जबरी चोरीसह ८ गंभीर गुन्हे.

२) अर्जुन बिरबल राठोड (वय ४१, रासे)

गावठी हातभट्टी दारू विक्रीचे ५ गुन्हे.

३) शरद ज्ञानेश्वर मोरे (वय २७, रिहे-मुळशी)

खून, दरोड्याचा प्रयत्न, अपहरण, अग्निशस्त्र बाळगणे असे ५ गुन्हे.

४) रजीत लक्ष्मण येरकर (वय १९, नाणेकरवाडी)

खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, धारदार हत्यारे बाळगणे असे ३ गुन्हे.

*कोठे करण्यात आली स्थानबद्धता? -

रामदास साळुंके – नागपूर मध्यवर्ती कारागृह

अर्जुन राठोड – हरसुल कारागृह, छ. संभाजीनगर

शरद मोरे – कळंबा कारागृह, कोल्हापूर

रजीत येरकर – येरवडा कारागृह, पुणे,

या सर्व आरोपींविरुद्ध खून, अपहरण, दरोडा, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत होता.

*पोलीसांचा इशारा -

गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून, परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रतिबंधक उपाययोजना पुढेही केल्या जाणार आहेत.

“चाकण-महाळुंगे परिसरात दहशत माजवणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत थेट कारागृहात डांबले आहे. एमपीडीए अंतर्गत ही मोठी कारवाई मानली जात आहे.”