गडद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मोफत संगणक
गडद ( ता.खेड, जि.पुणे ) ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत किसन शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रसिद्ध उद्योजक जालिंदर कातकडे, मयूरशेठ विखे, हरिशेठ भवर यांच्याकडून मोफत संगणक भेट देण्यात आली .
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे आणि तंत्रज्ञानाच्या युगात उज्वल यश प्राप्त करावे,या उद्देशाने हा संगणक देण्यात आले.
या प्रसंगी विद्यमान सरपंच चंद्रकांत किसन शिंदे,माजी सरपंच रामदास गबाजी शिंदे,माजी सरपंच अरुण सावंत,माजी चेअरमन दिलीपराव ससाणे, उद्योजक गणेश तळेकर,ग्रामपंचायत सदस्य विमलताई कौदरे,लक्ष्मीबाई शिंदे,नामदेव भिवा शिंदे, कैलास बबन शिंदे,बाबाजी कौदरे, प्रकाश शिंदे,बाबुराव सखाराम शिंदे,काशिनाथ निकम,नंदाबाई बबन शिंदे,जनाबाई,किसन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षक प्रमोद पारधी,नारायण करपे,तानाजी महाळुंगकर,संदीप कचाटे यांनी सर्व मान्यवर व उपस्थित ग्रामस्थ यांचे आभार मानले.