विद्यानिकेतन स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जनजाती अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात

 0
विद्यानिकेतन स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जनजाती अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात

चाकण ( पुणे ) श्री एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलकडून जनजाती कल्याण आश्रमाला विद्यार्थ्यांकडून आर्थिक स्वरुपात देण्यात आली. 

 यावेळी संस्थेचे माननीय तुषारीका लिमये (व्हाइस प्रेसिडेंट पुणे महानगर परिषद),सचिव सुरेश हनुमंते प्रकाश जोशी,संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख, सचिव रोहिणीताई देशमुख,मुख्याध्यापक दिपक शिंदे,समन्वयक सोमनाथ हतुरे,माधुरी घोडेकर यांची उपस्थिती होती.

 आपण आपले आयुष्य जगत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या उक्तीप्रमाणे शाळेच्या विद्यार्थ्यांकडून समाजासाठी दरवर्षी एक मुठ्ठी अनाज,हर हात किताब असे उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याप्रमाणे याही वर्षी जनजाती कल्याण आश्रमाला आर्थिक मदत करण्यात आली. 

 “आम्हाला गरजू लोकांना मदत करण्यासाठी काहीतरी करायचे होते.” यासाठी आम्ही हा निधी संकलित केला असे मत शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी कु. शौर्य सुर्वेने व्यक्त केले.संस्थेच्या सचिव रोहिणीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू ,अनाथ विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते,याला साथ देत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने निधी संकलित केला.

 जनजाती कल्याण अनाथाश्रमातील मुलांना मदत करण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शक्य तेवढी मदत केली पाहिजे असे आवाहन शाळेतील मुख्याध्यापक दिपक शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय मराठी शिक्षिका अर्चना वायाळ यांनी केले,आभार प्राजक्ता गायकवाड यांनी मानले.