उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चाकणमध्ये जाहीर सभा;शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सह्याद्री DIGITAL NEWS - चाकण नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणमध्ये जाहीर सभा घेणार असून या सभेला खेड तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
चाकण नगरपरिषदेचे निवडणूक वातावरण तापू लागले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. शहरातील विविध विकासकामांचा आढावा,निवडणूक दिशा आणि उमेदवारांना दिला जाणारा पाठिंबा या विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
चाकण शहरातील शिवसैनिकांमध्येही या सभेबाबत उत्सुकता असून मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहील,असा विश्वास स्थानिक नेतृत्वाने व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारी ठरेल, असे बोलले जात आहे.
चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये ही सभा उद्या (दि.२८) दुपारी दोन वाजता होणार आहे.चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्यासह सर्व प्रभागातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उपस्थित राहणार आहेत. अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली आहे.