शिवसेना पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनिषाताई गोरे यांचा प्रचार पोहचला शिगेला; मतदारांचा वाढता पाठिंबा
सह्याद्री DIGITAL NEWS - चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार चांगलाच जोर धरू लागले आहे.स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई गोरे यांनी शहरातील सर्व प्रभागातील शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसह प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील गोल्डन चौकातून प्रचाराला जोरदार सुरवात झाली.यावेळी मोठया संख्यने युवक,महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रचारात सामील झाले होते. प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी भेटी घेऊन अडीअडचणी समजून घेत तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखा- जोखा समोर ठेऊन आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत आश्वसन दिले जात असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यातून चाकण शहरासाठी विविध झालेली विकास कामे,चाकणसाठी पिण्याचे पाणी राखीव करणे,नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर,जाचक करवाढ रद्द,मुख्यमंत्री सहायता निधी,आयुष्यमान आरोग्य कार्ड,लाडकी बहीण योजनामुळे मतदारांचा उस्फुर्तपणे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा मिळत आहे.मतदाराच्या मतदान रुपी आशीर्वाद यामुळे विजय निश्चिचित असल्याचा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.