शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार मनिषाताई गोरे यांची प्रभाग क्र.१२ मध्ये प्रचार आघाडी

 0
शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार मनिषाताई गोरे यांची प्रभाग क्र.१२ मध्ये प्रचार आघाडी
शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार मनिषाताई गोरे यांची प्रभाग क्र.१२ मध्ये प्रचार आघाडी

सह्याद्री DIGITAL NEWS - चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचाराने चांगलीच रंगत वाढली आहे. शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई गोरे यांनी तसेच प्रभागातील शिवसेना पक्षाच्या उमेदवार कृष्णा आनंदराव सोनवणे व सविता सुरेश पानसरे यांनी प्रचाराचा धुराळा उडवीला आहे. आज प्रभाग नं १२ आझाद हिंद गणपती मंदिर येथून जोरदार सुरवात झाली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितिनभाऊ गोरे,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई सुरेशभाऊ गोरे, प्रभागातील उमेदवार कृष्णा आनंदराव सोनवणे, सविता सुरेश पानसरे यांच्या सह मोठया संख्यने युवा, महिला आणि नागरिक प्रचारात सामील झाले. प्रत्यक्ष मतदार यांच्या गाठी भेटी घेऊन अडीअडचणी समजून घेत तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून आज पर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखा- जोखा समोर ठेऊन आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत आश्वसन दिले. 

   नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्व.मा.आमदार सुरेशभाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यातून चाकण शहरासाठी विविध झालेली विकास कामे,चाकण साठी पिण्याचे पाणी राखीव करणे, नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर, जाचक करवाढ रद्द, मुख्यमंत्री सहायता निधी, आयुष्यमान आरोग्य कार्ड, लाडकी बहीण योजना यामुळे नागरिक उस्फुर्त पणे शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत मतदाराच्या मतदान रुपी आशीर्वाद यामुळे विजय निश्चिचित असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.