चाकणला भर दिवसा बंद घराचे कुलूप तोडून आठ लाख रुपयांची धाडशी चोरी

 0
चाकणला भर दिवसा बंद घराचे कुलूप तोडून आठ लाख रुपयांची धाडशी चोरी

सह्याद्री DIGITAL NEWS - बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले आठ लाख वीस हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना नाणेकरवाडी (ता.खेड )येथे (दि.४) च्या दुपारी बारा ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 कैलाश मुन्ना पंडोले ( वय.२८ वर्षे,सध्या रा.आर्यन विष्व बिल्डींग,नाणेकरवाडी,ता.खेड,जि.पुणे,मुळ पत्ता- मु. दहिंद्री, पो. चुर्नी, ता. चिखलदरा जि. अमरावती) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कैलास पंडोल हे नाणेकरवाडी येथील आर्यन विष्ण या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत आहेत.काही कामाच्या निमित्ताने घराच्या मुख्य दरवाज्याला कुलूप लावून बाहेर गेले होते.अज्ञात चोरट्याने याचा गैरफायदा घेत दरवाज्याचे कुलूप कशाने तरी तोडून घरात प्रवेश करत बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचे गंठण,नाकातील नथ,चांदीचे पैंजण,सोन्याची कानातील झुबे आणि ५०० रुपयांच्या ९९८ नोटा असा ८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.भर दुपारी झालेल्या या धाडशी चोरीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.