अस काय घडलं की विवाहितेने लग्नानंतर सहा महिन्यातच उचलले टोकाचे पाऊल

 0
अस काय घडलं की विवाहितेने लग्नानंतर सहा महिन्यातच उचलले टोकाचे पाऊल

चाकण ( पुणे ) : घर खर्चासाठी आणि शिक्षणाला तुझ्या घरच्यांकडून पैसे घेऊन ये असे म्हणत शारीरीक व मानसिक छळ व शिवीगाळ मारहाणीचा त्रास असह्य होत असल्याने तेवीस वर्षीय विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि.२५ ) आंबेठाण (ता.खेड ) येथे घडली आहे.

भगवान सखाराम खंदारे (वय.५६ वर्ष,धंदा शेती, रा.कोंढई,ता.पुसद,जि.यवतमाळ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 प्रशांत संजय धोंगडे सध्या (सध्या रा.आंबेठाण, दवणेवस्ती,ता. खेड,जि.पुणे,मुळ रा.जनुना,ता. उमरखेड,जि.यवतमाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लग्नानंतर सहा महिन्यांनी पती प्रशांत याने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन,तुझ्या वडिलांकडून घर खर्चाला आणि शिक्षणासाठी पैसे घेऊन ये असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केला.आरोपी प्रशांतकडून सतत शिवीगाळ - मारहाण करण्यात येत असल्याचा त्रास असह्य झाल्याने पहाटे किचन ओट्याजवळील पंख्याच्या हुकला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.