अजितदादांना खेड तालुका पत्रकार संघाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

 0
अजितदादांना खेड तालुका पत्रकार संघाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

सह्याद्री लाईव्ह | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.त्यांना खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने खेड पंचायत समिती आवारातील पत्रकार संघ कार्यालयात अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी संघाचे अध्यक्ष निलेश आंधळे,माजी अध्यक्ष महेंद्र शिंदे,बाळासाहेब सांडभोर,सुनिल थिगळे,किरण खुडे,राजेंद्र लोथे,रामचंद्र सोनवणे, नाजीम इनामदार,प्रभाकर जाधव,अशोक कोरडे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज (दि.२८) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांचे खासगी चार्टर्ड विमान भीषण अपघातग्रस्त झाले.या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील इतर चार जणांचा वैमानिक, क्रू मेंबर आणि सुरक्षा रक्षक जागीच मृत्यू झाला.विमान मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना हा अपघात झाला.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. परखड,स्पष्टवक्ते आणि जनसामान्यांच्या हितासाठी झटणारे अजितदादा यांचे अपघाती निधन झाल्याने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

अजितदादा यांच्या स्मृतीला वाहून पत्रकारांनी दोन मिनिटे मौन पाळले आणि त्यांच्या कुटुंबीयांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व महाराष्ट्राला या अपरिमित दुःखातून सामर्थ्य मिळावे,अशी प्रार्थना केली.