शिरदाळे येथे वैकुंठवासी नामदेव नाना तांबे यांच्या स्मरणार्थ दीपोत्सव उत्साहात

 0
शिरदाळे येथे वैकुंठवासी नामदेव नाना तांबे यांच्या स्मरणार्थ दीपोत्सव उत्साहात

आंबेगाव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिरदाळे,ता. आंबेगाव,जि. पुणे येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरामध्ये दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेनिमित्त वैकुंठवासी ह.भ.प. नामदेव नाना तांबे यांच्या स्मरणार्थ भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मंदिर परिसरात हजारो दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला असून, वातावरणात भक्तिमय आणि उत्साहाचे चैतन्य निर्माण झाले होते. या दीपोत्सवासाठी ग्रामस्थ तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी ह.भ.प.किसन महाराज तांबे,तान्हाजी महाराज तांबे,देवराम रणपिसे,सुभाष काचोळे, प्रभाकर तांबे,शंकर तांबे,संदीप मिंडे,संतोष रणपिसे,संतोष तांबे,सुभाष तांबे,गणेश तांबे, दत्ताभाऊ रणपिसे,देविदास रणपिसे,जगदीश रणपिसे,सुभाष तांबे,संजय तांबे,संदेश वाघ यांच्यासह वृक्षवल्ली आम्हा सोयरे मित्र परिवार व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षवल्ली आम्हा सोयरे मित्र परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तयार केलेल्या किल्ल्यांचे परीक्षण करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच वैकुंठवासी नामदेव नाना तांबे यांच्या स्मरणार्थ ‘॥ जय श्रीराम ॥’ असे डिजिटल अक्षरात साकारण्यात आलेल्या आकर्षक स्मृतीफलकाचे अनावरणही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दीपोत्सवाच्या माध्यमातून श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम शिरदाळे ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, विद्यार्थी आणि आयोजकांचे सहकार्य लाभले.